🕯️बॉलिवूड व छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

🕯️बॉलिवूड व छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या..

बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने ३४ वर्षी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात रविवारी १४ जून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आकस्मात निधनाची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. परंतु त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याची अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे.

⏺️ सुशांत सिंह राजपूत याची अखेरची पोस्ट चर्चेत..
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मनात नेमके काय विचार सुरु होते हे सांगणं कठीण आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतने त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं. त्याची ही पोस्ट सध्या चर्चिली जात आहे.

⏺️ कोण आहे सुशांत सिंह राजपूत ?..
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत घराघरात पोहोचला होता. छोट्या पडदा गाजवल्यानंतर या अभिनेत्याने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला होता. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. त्यानंतर एम.एस.धोनी, केदारनाथ, छिछोरे, शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

⏺️ अभ्यासातही सुशांत सिंह राजपूत हुशार..
२००३ मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत सुशांतने देशातून सातवा क्रमांक मिळवला होता. सुशांत दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (आता दिल्ली टेक्निकल विद्यापीठ)मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. तिसऱ्या वर्षी सुशांतने शिक्षण सोडून आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. विशेष म्हणजे, सुशांतने आयएसएम धनबादसह इंजिनिअरिंगच्या तब्बल ११ परीक्षा पास केल्या होत्या. तसेच तो फिजिक्समध्ये नॅशनल ओलंपियाड विजेताही होता.

Post Bottom Ad

#

Pages