😱पुण्यात पासोड्या विठोबा मंदिरात चोरी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

😱पुण्यात पासोड्या विठोबा मंदिरात चोरी..

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील पासोड्या विठोबा मंदिरात रविवार पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळच उडाली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार पेठ परीसरात असलेल्या पासोड्या विठोबा मंदिरात आज पहाटेच्या सुमारास मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले असता मंदिरातील दरवाजा त्यांना तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले तर दानपेटीमधील पैसे चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटे मंदिराचा दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावर गेले आणि त्यानंतर दानपेटी फोडली. सदर घटनेप्रकरणी फरासखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages