🚨पुणे परिमंडळ 5 चे पोलिस मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांवर ठेवणार लक्ष.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

🚨पुणे परिमंडळ 5 चे पोलिस मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांवर ठेवणार लक्ष..

महापालिकेने होम क्वारंटाईन व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सुरु केलेल्या 'होम क्वारंटाईन ट्रैकिंग सिस्टिम' (एचक्युटीएस) धर्तीवर पुणे पोलिसांनी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी 'एक्सटर्ननीस मॉनिटरिंग अॅण्ड ट्रैकिंग सिस्टिम' (एक्स्ट्रा) हे नवीन मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. परिमंडळ पाचच्या पोलिसांनी एका हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवण्यासाठी याचा पहिल्यांदा वापर केला आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी महापालिकेने 'होम क्वारंटाईन ट्रैकिंग सिस्टिम' (एचक्युटीएस) सुरू केली होती. दरम्यान, मागील काही महिन्यापासून पोलिसांनी शहरातून हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांचा वावर पुन्हा वाढल्याचे आणि त्यांच्याकडून गुन्हे होत असल्याचे चित्र होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु होते.

त्याचवेळी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी हद्दपार नियमांचा भंग करणाऱ्याविरुद्ध 'एचक्युटीएस'च्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपायुक्त बच्चन सिंग आणि सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी 'एक्स्ट्रा' मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली.

विशेष आदेशानुसार, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विराज जगदीश यादव (रा.हडपसर) याच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण यावे, यासाठी पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या मोबाईलमध्ये 'एक्स्ट्रा' मोबाईल अॅप्लिकेशन इन्स्टॉल केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages