👉पुण्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार का ?यावर पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा खुलासा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

👉पुण्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार का ?यावर पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा खुलासा..

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा देशात सर्वाधिक आहे. त्यातच राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातील अनलॉक 1 सुरूवात झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार का? अशी चर्चा सर्वच माध्यमांमध्ये रंगली होती. पण, यावर पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी खुलासा केला आहे.

आता पुणे शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ होत असल्यामुळे शहरात उद्यापासून म्हणजे 15 जूनपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा रंगली होती. पण, असे असले तरी पुन्हा एकदा शहरात लॉकडाउन लागू करण्याची शक्यता कमीच आहे. येत्या सोमवारपासून शहरात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा आमचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण लॉकडाउनच्या काळात ज्या भागात जास्त प्रमाणात आढळले होते. तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. पुण्यातील जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता आता तिथेही रुग्ण आढळून आल्यामुळे ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली असून त्याचबरोबर सोमवारी दिनांक 15 जून रोजी या बाबतचा आदेश हा काढण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages