🕯️दु:खद..कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील 4 योद्ध्यांचा कोरोनामुळे मृत्यू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

🕯️दु:खद..कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील 4 योद्ध्यांचा कोरोनामुळे मृत्यू..

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यात पोलिस दलातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील आणखी 4 योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

1) पोलिस कॉन्स्टेबल संदेश किणी (बोरिवली पोलिस ठाणे),
2) पोलिस हवालदार हेमंत कुंभार (दिंडोशी पोलीस ठाणे),
3) पोलिस हवालदार अनिल कांबळे (वाकोला पोलीस ठाणे),
4) एएसआय दीपक लोळे (संरक्षण विभाग) हे कर्मचारी तैनात होते. या 4 पोलिस कर्मचारी योद्ध्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसात 129 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 3388 एवढी झाली आहे. आतापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 40 पोलिसांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages