🚨विराज जगताप घटनेप्रकरणी समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ प्रसारित करू नये ; पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे नागरीकांना आवाहन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 14, 2020

🚨विराज जगताप घटनेप्रकरणी समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ प्रसारित करू नये ; पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे नागरीकांना आवाहन..

पिंपरी-चिंचवडमध्ये विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी जेरबंद आहेत. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शास येत आहे.  या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे केल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले की,
८ जून रोजी विराजचा खून झाला. तांत्रिक आधारे गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. तरी सर्व नागरीकांना आवाहन आहे की, पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. घटनेचा जो तपास होईल तो पुराव्याच्या आधारावर होईल. संबंधित घटनेप्रकरणी काहीजण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सायबर सेल हे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. जातीय तेढ निर्माण होईल असं काही कृत्य करू नका. सोशल मीडियावर कमेंट किंवा इतर गोष्टी प्रसारित करू नयेत. तसं कोणी केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Post Bottom Ad

#

Pages