🚨मोबाईल चोरीकरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा बिबवेवाडी पोलीसांनी पाठलाग करून केले जेरबंद ; 1 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 15, 2020

🚨मोबाईल चोरीकरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा बिबवेवाडी पोलीसांनी पाठलाग करून केले जेरबंद ; 1 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत..

पुणे शहर बिबवेवाडी परिसरात मोबाईल चोरी करून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या पाठलागकरून बिबवेवाडी पोलीस ठाणेचे बीट मार्शल पोलीस कर्मचारी डाके व कोठावळे यांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 22 मोबाईल व 1 टू व्हिलर गाडी असा एकूण 1 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1) मनोज यल्लप्पा मुदगल (वय 39),
2) धर्मा तीम्मा भद्रावती (वय 26) हे दोघे राहणार दोबरवादी, घोरपडी, पुणे असे अटक करण्यात अालेल्या अारोपींची नावे अाहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी रामेश्वर गायकवाड (रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) हे रविवारी दि.14 रोजी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे येथील चिकनच्या दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी जात असतांना दुचाकीवर अालेल्या दोन तरुणानी रामेश्वर गायकवाड यांच्या पाठीला हात लावून "तुम्हाला तिकडे कोणीतरी बोलावत आहे." अशी बतावणी करून फिर्यादीचे लक्ष विचलीत होताच त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करून पळ काढला. फिर्यादी यांना मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मोबाईल चोरट्यांचा पाठलाग केला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले बीट मार्शल पोलीस कर्मचारी डाके व कोठावळे यांनी दुचाकीवरून दोन संशयिततरुण पळून जात असल्याचे दिसताच त्यांनी दोन संशयित तरुणांचा पाठलाग करून ताब्यात घेत बिबवेवाडी पोलीस ठाणे मध्ये आणत बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या अधिपत्याखालील तपास पथकाने सखोल चौकशी केली असता त्‍यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बिबवेवाडी, वानवडी व कर्नाटकमध्ये चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आणत त्यांच्या ताब्यातून 22 महागडे मोबाईल व 1 टू व्हिलर गाडी असा एकूण 1 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरूद्ध बिबवेवाडी पोलीस ठाणेमध्ये गु.र.न 436/2020 भा.द.वि कलम 379, 34 अन्वय प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनील फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस कॉन्स्टेबल डाके, लोधा, शितोळे, मोरे, महांगडे, शेलार, कोठावळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages