😱तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 16, 2020

😱तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला..

दोन भावांपासून शेजाऱ्यांना त्रास होत असल्याने शेजाऱ्यांनी याची तक्रार मालवण पोलीस ठाणेमध्ये दाखल केली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस सोमवारी १५ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास वायरी लुडबेवाडी येथील घटनास्थळी गेले असता दोघा भावांनी पोलीस पथकावर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन जीवघेणा हल्ला केला. यावेळी झालेल्या जीवघेणा हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. या सर्व जखमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोहन अनंत लुडबे, विवेक अनंत लुडबे या दोन भावांविरोधात मालवण पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वायरी लुडबेवाडी येथील मोहन अनंत लुडबे आणि विवेक अनंत लुडबे या दोन भावांविरोधात नजीकच्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीच्या चौकशीसाठी पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास टेंबुलकर आणि डी.व्ही.जानकर हे सोमवारी १५ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास वायरी लुडबेवाडी येथील घटनास्थळी गेले असता मोहन आणि विवेक यांनी पोलिसांवर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन अचानक हल्ला चढवला. त्यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक येथे मागवण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह हेड कॉन्स्टेबल डी.व्ही.जानकर, विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर, मंगेश माने आणि दिलीप खोत यांना दुखापती झाल्या आहेत. यातील हेड कॉन्स्टेबल डी.व्ही.जानकर याना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके घालण्यात आले आहेत. त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages