🚨पुण्यात तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 17, 2020

🚨पुण्यात तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल..

सांगवी येथील एका खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका २४ वर्षीय तरूणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरूणीने मंगळवारी दि.१६ रोजी सांगवी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार १८ जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सोशल मीडियावर बदनामी करणारे मेसेज, फोटो कोणी पोस्ट करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्‍त विनायक ढाकणे यांनी यापुर्वीच केले होते.

काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या होत्या याप्रकरणी संबंधित एका २४ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली होती. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर करीत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी होईल, असे मेसेज कोणीही टाकू नयेत. धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्‍तव्य किंवा व्हिडिओ टाकू नयेत. सध्या सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड सायबर सेलचे बारीक लक्ष आहे.

अशा प्रकारची पोस्ट फेसबुक, व्हॉटस्‌ अप, टिकटॉक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

#

Pages