😷महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर करावी कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 17, 2020

😷महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर करावी कारवाई..

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हा कोरोनावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. रस्त्यांवर होणार्या विक्रीमुळे नजीकच्या सोसायट्यांची डोके दु:खी वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोनाचा विषाणूचा प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करीत आहेत.

गुलटेकडी मार्केटयार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि केळी विभाग खबरदारी म्हणून काही काळ बंद होता. परंतु, मागील 10 दिवसांपासून मार्केटयार्डातील फुलविभाग वगळता सर्व विभाग सुरू झाले आहेत. याठिकाणी बाजार समिती परिसरात प्रशासन, अडते, हमाल, तोलणार सर्व प्रकारची खबरदारी घेऊन काम करत आहेत. तर दुसरीकडे राजाराम पुल, दांडेकर पुल, गंगाधाम चौक, कोंढवा, गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर चौक, कोथरूड, कर्वेनगर, वारजे ते एनडीए रस्ता, सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज आंबेगाव रस्ता, कात्रज खडीमशीन चौक रस्ता, वडगाव पुल, फातेमा नगर चौक आदी ठिकाणी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता सर्रासपणे भाज्या व फळांची विक्री सुरू आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

शहरात अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या समोर विक्री केली जात आहे. यामुळे तेथे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर आरडा-ओरडा होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खरेदीसाठी गर्दी होते आहे. त्यातील अनेक लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन व्यक्तीत अंतर बाळगले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. उघड्यावर असलेल्या भाज्या आणि फळांना प्रत्येकजण हाताळून बघत असतो. विक्रीच्या ठिकाणी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवरील धोकादायक खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ही विक्री थांबवण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages