😱पोलिस मुख्यालयाच्या आवरातच बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 18, 2020

😱पोलिस मुख्यालयाच्या आवरातच बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न..

सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर जेव्हा चोरट्यांची नजर पडते तेव्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांच्या नजीकच चोरटे चोऱ्या करण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा चोरट्यांचे धाडस किती वाढले आहे, असा सवाल उपस्थित होतो. असाच प्रत्यय नवी मुंबई पोलिसांना आला आहे.

कळंबोली वसाहतीतील नवी मुबंई पोलिसांच्या मुख्यालयाच्या आवरातील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरटयांनी बुधवारी रात्री केला आहे. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेल्या एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात शांत असलेले गुन्हेगार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी पनवेल परिसरातील दोन एटीएम केंद्रात चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी रात्रीच्या सुमारास केला आहे. तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवीचा पाडा येथे असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमची तोडफोड करूनही पैसे चोरण्यात अपयशी ठरलेल्या चोरटयांनी एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच कळंबोली पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रोडपाली येथील पोलिस मुख्यालयाच्या आवारातील एटीएम मशीनची देखील तोडफोड करणाऱ्या चोरट्यांना दोन्ही ठिकाणी पैसे चोरण्यात मात्र अपयश आले आहे. दोन्ही ठिकाणी घडलेल्या प्रकारची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages