🚨खून प्रकरणी स्थानिक वृत्त वाहिणीवर वादग्रस्त वक्तव्य व व्हॉटसअप ग्रुपवर भडकाऊ मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 18, 2020

🚨खून प्रकरणी स्थानिक वृत्त वाहिणीवर वादग्रस्त वक्तव्य व व्हॉटसअप ग्रुपवर भडकाऊ मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

पिंपरी-चिंचवडमधील एका खून प्रकरणी स्थानिक वृत्त वाहिणीवर वादग्रस्त वक्तव्य केले तसेच व्हॉटसअप ग्रुपवर भडकाऊ मेसेज पाठवल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

मयुर मुंडे, आनंद जुनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वी प्रेमप्रकरणातून एका तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. यासंदर्भात सोशल मिडियातून भडकाऊ संदेश तसेच संबंधीत मुलीची छायाचित्र फिरत आहेत. यामुळे समाजात तणाव वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. विराज जगताप खून प्रकरणी फेसबुकच्या साईटवरील पीसीबीटी टुडे डॉट इन या वेबसाईटवर खुनप्रकरणी धार्मिक रंग मुद्दामुन चढवला जात आहे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर मयुर मुंडे याने वादग्रस्त वक्तव्य नोंदवले होते. तसेच औंध शिवाजीनगर न्यूज या व्हॉटसअप ग्रुपवर आनंद जुनवणे याने पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशामध्ये भडकाऊ असे भाषा वापरली आहे. आरोपींनी सामाजीक भावना दुखावून , धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे समजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात सुरवात केली आहे. संबंधीत तरुणीची छायाचित्र सोशल मिडियावर टाकून तणाव निर्माण केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages