😱अजब..चोराच्या घरी चोरी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 19, 2020

😱अजब..चोराच्या घरी चोरी..

घरफोडीच्या आरोपाखाली अटक केलेल्या संशयीत चोराचे घर चोरट्यांनी लुटल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे. हा आरोपी आणि त्याचे कुटुंबीय कोरोनाबाधित असल्यामुळे सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत.

वृत्तसंस्थेनुसार, कुर्ला येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानावर दरोडा घातल्याप्रकरणी सात जणांना काही काळापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यातील पाच जण हे कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना जामीन मिळाला आणि त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आलं. 7 जून रोजी त्यांच्या कुटुंबीयांनाही वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं.

देवनार येथील क्वारंटाईन कक्षात दाखल झालेल्या एका कुटुंबाला त्यांच्या शेजाऱ्यांचा निरोप मिळाला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्यांच सांगितलं. त्यांचं चेंबुर इथलं घर रिकामं आहे, असं पाहून तिथे जबरी चोरी करण्यात आली. त्यात जवळपास साडे चार लाखांचा ऐवज चोरी झाला आहे. यात अडीच लाख रुपये रोख रकमेचाही असून पुढील तपास सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages