👉महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 19, 2020

👉महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध..

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. देशभर कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून केंद्रीय औषधीनिर्माण विभागाच्यावतीने प्रतिपॅड 1 रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले येत आहेत.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपक्निसची किंमत कमी करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जनऔषधी केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे पॅड हे पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जैव-विघटनशील आहे. हे साहित्य ‘एएसटीएम डी-6954’ मानकांनुसार बनविण्यात आलेले आहे. बाजार भावानुसार प्रति पॅड सॅनिटरी  नॅपकिन्सची किंमत 3 ते 8 रूपये आहे. बऱ्याच महिलांना ते परवडण्या सारखे नसते. त्यामुळेच प्रतिपॅड 1 रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. वर्तमानात कोविड-19 च्या कठीण काळात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रामार्फत औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा निरंतर केला जात आहे. या सर्व जनऔषधी केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपये प्रतिपॅड दराने उपलब्ध करून दिले जात आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय जनऔषधी केंद्रांची संख्या..
▪️ पुणे - 24
▪️ अहमदनगर - 08
▪️ अकोला - 09
▪️ अमरावती - 10
▪️ औरंगाबाद - 12
▪️ बीड - 24
▪️ भंडारा - 01
▪️ बुलढाणा - 19
▪️ चंद्रपूर - 05
▪️ धुळे - 05
▪️ गडचिरोली - 01
▪️ गोंदिया - 05
▪️ हिंगोली - 04
▪️ जळगाव - 12
▪️ जालना - 27
▪️ कोल्हापूर - 12
▪️ लातूर - 47
▪️ मुंबई - 01
▪️ मुंबईशहर - 34
▪️ मुंबई उपनगर - 03
▪️ नागपूर - 09
▪️ नांदेड - 17
▪️ नंदूरबार - 02
▪️ नाशिक - 16
▪️ उस्मानाबाद - 12
▪️ पालघर - 12
▪️ परभणी - 17
▪️ रायगड - 09
▪️ रत्नागिरी - 01
▪️ सांगली - 12
▪️ सातारा - 15
▪️ सोलापूर - 15
▪️ ठाणे - 44
▪️ वर्धा - 02
▪️ वाशिम - 05
▪️ यवतमाळ - 04

Post Bottom Ad

#

Pages