🚨पुण्यात वाहतूक पोलिसांकडून नकोसी असलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीला मिळाली मायेची उब..10 तासांत चिमुकलीच्या काकाचा पोलिसांनी घातला शोध.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 19, 2020

🚨पुण्यात वाहतूक पोलिसांकडून नकोसी असलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीला मिळाली मायेची उब..10 तासांत चिमुकलीच्या काकाचा पोलिसांनी घातला शोध..

पुण्यातील कोथरूड येथील चांदणी चौकाजवळ असलेल्या निर्मनुष्य भागात अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीला टाकून अज्ञात व्यक्तीने पळ काढला होता. यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाल करत या चिमुकलीच्या काकाला 10 तासांच्या आत शोधून काढत चिमुकलीला पोलिसांनी काकांच्या हवाली केले आहे. चिमुरडीची आई ही अद्याप बेपत्ता आहे.
बावधन परिसरातील एका निर्जन परिसरात सहसा माणसं येत जात नाहीत. गुरुवारी संध्याकाळी काही नागरिकांना तिथून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली होती. जवळ जाऊन पाहिले असता त्यांना चार महिन्यांची चिमुकली दिसून आली. या बाळाचे कोणी नातेवाईक जवळपास गेले आहे का हे या नागरिकांनी बराच वेळ पाहिलं, मात्र त्यांना कोणीही दिसून आलं नाही. या मुलीला कोणीतरी सोडून दिल्याचं कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली.

कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत मुलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली.

👌वारजे वाहतूक पोलिसांकडून चार महिन्यांच्या चिमुकलीला मिळाली मायेची उब..
वारजे वाहतूक विभागामध्ये पोलिस हवालदार असलेले सुरेश शिंदे व पोलिस शिपाई सुजय पवार हे दोघेही त्यांच्या सहकाऱ्यासमवेत गुरुवारी चांदणी चौकात वाहतूक नियमन करीत होते. सायंकाळी पावणेसहा वाजता पावसाची रिपरीप सुरु होती. तेवठ्यात कोथरुडच्या दिशेने जाणाऱ्या उताराच्या रस्त्याच्याकडेला भागात नागरीकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी याबाबत शिंदे व पवार यांना सांगितले. त्यामुळे ते दोघेही धावतच तेथे गेले. त्यावेळी कपडयात बांधलेले बाळ पावसातच कोणीतरी सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनीही बाळाला उचलून घेत आपल्या कवटाळले. ते भुकेने व्याकुळ झाल्याचे पाहुन पोलिसांनी लगेचच त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली. व स्थानिक कोथरुड चे नगरसेवक किरण दगडे पाटिल यांनी सुद्धा तिथे तत्काळ येऊन पुढील तपासासाठी पोलिसांना सहकार्य केले.

Post Bottom Ad

#

Pages