😱धक्कादायक ! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या !! मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 19, 2020

😱धक्कादायक ! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या !! मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट..

पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सुखसागर येथील वाघजाईनगरमध्ये राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाने आपलं जीवन संपवलं आहे. काल रात्री पुण्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अद्याप या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नसून या कुटुंबात दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा समावेश होता. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
१) अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष),
२) जया अतुल शिंदे (३२ वर्ष),
३) ऋग्वेद अतुल शिंदे (६ वर्ष),
४) अंतरा अतुल शिंदे (३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सूरू आहे.
मिळालेला प्राप्त माहितीनुसार,
मुळचे परभणीचे असणारे अतुल आणि जया यांचा 2013 रोजी प्रेम विवाह झाला होता. पुण्यातील वाघजाईनगर सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एक इथे मित्राच्या घरात भाड्याने राहात होते. त्यांना दोन मुलं होती. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या घरातून कोणतीही हालचाल होत नव्हती. तसंच व्हाईट्सअॅप किंवा फोनवर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतं नव्हता. त्यामुळे याबाबत शेजाऱ्यांकडून पोलिसांना काल रात्री माहिती देण्यात आली. मग त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरात चौघांचे गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले. अतुल शिंदे हे शाळकरी मुला-मुलींचे ओळखपत्र तयार करून देण्याचे काम करत होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे त्यांच्या व्यवसाय बंद असल्याने ते आर्थिक विवंचनेमध्ये होते. त्यामुळे आर्थिक विवंचनेने या कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी घरामध्ये पोलिसांना पेन्सिलिनं भिंतीवर लिहिलेली सुसाईट नोट सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत असं पेन्सिलिनं भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळावर मिळाली आहे.
दरम्यान पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आर्थिक संकटामुळे या कुटुंबीयानं टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु तपासाअंती स्पष्ट होईल अशी माहिती भारती विद्यापिठ पोलिसांनी दिली आहे.

Post Bottom Ad

#

Pages