🚨पुण्यात कोंढवा पोलिसांनी दोन तासातच खूनाच्या दाखल गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 2, 2020

🚨पुण्यात कोंढवा पोलिसांनी दोन तासातच खूनाच्या दाखल गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या..

कोंढवा परिसरात सोमवार दि.१ जून रोजी सायंकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाची पालघनने डोक्यात व शरीरावर सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या दाखल गुन्ह्यातील आरोपींचा कोंढवा तपास पथकातील पोलिस शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी आदर्श चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे.

खुनाच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी १) तौसिफ फरिद सैय्यद (वय २३, रा.मिठानगर,कोंढवा खुर्द,पुणे), २) सैफ फरिद सैय्यद (वय २५, रा.मिठानगर,कोंढवा खुर्द,पुणे) यांना कोंढवा पोलिसांनी अटक करत दाखल गुन्ह्यातील दोन फरार आरोपी साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पाचव्या टप्प्यात कोंढवा परिसरात सोमवार दि.०१ जून रोजी सायंकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास शाहीद कॉर्नर, नवाजीश पार्क, कोंढवा, पुणे येथे (मयत) इसम बबलू इब्राहीम सैय्यद (वय ४६) याला आरोपी १) सैफ फरीद सैय्यद, २) तोसीफ फरीद सैय्यद व त्यांचे दोन साथीदारांनी पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पालगन हत्याराने डोक्यात व अगांवर इतरत्र सपासप वार करून जिवे ठार मारले. याप्रकरणी मयत इसमाचे चुलते लियाकत मंजरअली मिर (वय ६२, रा. कुभारवाडा चौक, कसबा पेठ, पुणे) यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाणेमध्ये गु.र.नं.७०२/२०२० भादंविसं क. ३०२,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाची घटना कळताच घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल..
गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलिस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.चेतन मोरे यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना आरोपींना तात्काळ पकडण्याचे आदेश दिले.

कोंढवा पोलिसांनी दोन तासातच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या..
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कोंढवा तपास पथकातील पोलिस आरोपीचा शोध घेत असतांना खूनाच्या दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी तौसिफ फरिद सैय्यद (रा. मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) व सैफ फरिद सैय्यद (रा. मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) हे दोघे पुणे आरटीओ परिसरात लपून बसल्याची माहिती कोंढवा तपास पथकातील पोलिस कर्मचारी आदर्श चव्हाण यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, पोलीस हवालदार संतोष नाईक, पोलिस नाईक सुशील धिवार, पोलिस नाईक अमित साळुखे, पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस शिपाई किशोर वळे, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण, पोलिस शिपाई ज्योतीबा पवार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरटीओ परीसरात आरोपींचा शोध घेवून त्यांना मोठया शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेत आरोपींची तपासकामी सखोल चौकशी केली असता दोन आरोपीने त्यांचे दोन साथीदारांच्या मदतीने खूनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणेमध्ये गु.र.नं.७०२/२०२० भादंविसं क. ३०२,३२३,५०४,३४ अन्वेय प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

कोंढवा तपास पथकातील पोलीस खुनाच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी साथीदारांचा शोध घेत पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या दाखल गुन्ह्यात अटक केलेले आरोपी १) तौसिफ फरिद सैय्यद (वय २३, रा.मिठानगर,कोंढवा खुर्द,पुणे),
२) सैफ फरिद सैय्यद (वय २५, रा.मिठानगर,कोंढवा खुर्द,पुणे) यांना कोंढवा पोलिसांनी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्याय दंडाधिकार्यानी शनिवार दि.०६ जून२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे मा.सहा.पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे व तपास पथकातील पोलीस हवालदार संतोष नाईक, पोलिस नाईक सुशील धिवार, पोलीस नाईक अमित साळुखे, पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस शिपाई निलेश वणवे, पोलिस शिपाई ज्योतीबा पवार, पोलिस शिपाई आदर्श चव्हाण, पोलिस शिपाई किशोर वळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages