📚एकसारखा अभ्यासक्रमासाठी "वन नेशन वन बोर्ड"ची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 20, 2020

📚एकसारखा अभ्यासक्रमासाठी "वन नेशन वन बोर्ड"ची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल..

वन नेशन वन बोर्डच्या मागणी आता पुन्हा एकदा देशभरातून नागरिकांनी उचलून धरली आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एकसारखा अभ्यासक्रम लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

भाजपचे नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, भारतीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र म्हणजेच ICSE आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSC) या दोन्ही बोर्डऐवजी एकच शिक्षण मंडळ स्थापन करावं. त्यानं अभ्यासक्रम ठरवून तो दोन्हीसाठी लागू करण्याबाबत विचार करावा असं या याचिकेत म्हटलं आहे.

देशभरात केंद्र आणि राज्य सरकारांनी समान शिक्षण प्रणाली राबविण्याच्या दृष्टीने कोणतंही पाऊल उचललं नाही. कलम 21 अ अंतर्गत विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाबद्दल मात्र बोललं जात आहे. या अंतर्गत मुलांना जो शिक्षणाचा हक्क आहे त्यापासून ते वंचित राहात असल्याचंही म्हटलं आहे. याचिकेनुसार सामाजिक आणि आर्थिक समानता विचारात घेऊन सर्व प्राथमिक शाळांचा अभ्यासक्रमही एकसारखा करण्यात यावा. जो कॉमन सिलॅबस असेल. केंद्र आणि राज्य दोन्हीसाठी हा लागू करण्याबाबत विचार करण्यात यावा असंही या याचिकेत म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्देश देतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages