👌पुण्यात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब, गरजवंतांना जयभवानी महीला मंडळ व जयभवानी टेक्निकल इंन्स्टिट्युट तर्फे अन्न-धान्यांच्या किटचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 20, 2020

👌पुण्यात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब, गरजवंतांना जयभवानी महीला मंडळ व जयभवानी टेक्निकल इंन्स्टिट्युट तर्फे अन्न-धान्यांच्या किटचे वाटप..

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त शुक्रवारी दि.19 मे रोजी पुण्यात बिबवेवाडीतील महेश सोसायटीमध्ये कोवीड-१९ चे संकट तसेच भारत-चीन सीमेवरील आपल्या जवानांचे हौतात्म्य लक्षात घेऊन केक कापणे, घोषणाबाजी करणे, बॅनर्स, होर्डिंग लावणे अशा गोष्टींना फाटा देऊन पीडित, गरीब, सफाईचे काम करणारे कोरोना योद्धया, गरजूंची गरज लक्षात घेऊन जयभवानी महीला मंडळ व जयभवानी टेक्निकल इंन्स्टिट्युटच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा.अभय छाजड यांच्या शुभहस्ते अन्न-धान्यांच्या किटचे वाटप कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून करण्यात आले. लडाखमध्ये चीनी सैनिकाबरोबर झालेल्या चकमकींमध्ये शहीद झालेल्या भारतीय 20 जवानांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहाण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात लोकांच्या दुःख, वेदना दूर करण्यासाठी आणि आधार देण्याच्या हेतूने कार्यक्रम करावेत, असा संदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला होता त्याचे गांभीर्याने पालन करत राधिका मखाले (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष, महाराष्ट्र राहुल गांधी विचार मंच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी, जय भवानी महिला मंडळ पुणे अध्यक्ष) व सौ.कल्पना उनवाणे (महाराष्ट्र राहुल गांधी विचारमंच पुणे शहर अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस, जय भवानी टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे अध्यक्ष) यांनी नियोजन करून प्रज्वल बनकर, सुभद्रा धमगुंडे, कांचन जाव्हेरी, महेश फडतरे, पंकज दर्शल, अय्याज खान, शंकर गुगरी, स्वप्ना दसाडे, नितिन दसाडे यांच्या सहकार्याने बिबवेवाडीत महेशसोसायटी येथे गोरगरीब, गरजू, पिडीतांना फूड पॅकेट्सच्या स्वरुपात अन्नदान करण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages