😱 पोलिस मुख्यालायत कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 20, 2020

😱 पोलिस मुख्यालायत कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या..

संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर आहे. डॉक्टर, नर्ससोबतच पोलिसही रात्रंदिवस आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यात हिंगोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

हिंगोली पोलीस विभाग मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणावरून चर्चेत आहे. हिंगोली येथील पोलिस मुख्यालायतील आरमोरर विभागत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. जितेंद्र साळी (वय-43) यांनी शनिवारी (ता. 20) दुपारी ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

हिंगोली येथील पोलिस मुख्यालयातील आरमोरर विभागात (शस्त्र दुरुस्ती) जितेंद्र साळी हे कार्यरत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच रायफलने हनुवटीत गोळी झाडून आत्महत्या केली.

मुख्यालयातून गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहऱ्याचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. जितेंद्र साळी यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages