🚨पुण्यात घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यात मोस्ट वॅान्टेड असलेल्या ४ आरोपींना हडपसर पोलिसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 20, 2020

🚨पुण्यात घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यात मोस्ट वॅान्टेड असलेल्या ४ आरोपींना हडपसर पोलिसांनी केले जेरबंद..

पुण्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यात मोस्ट वॅान्टेड पाहिजे असलेल्या ४ आरोपींना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यापैकी एक आरोपी विधीसंघर्षीत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ६ लाख १० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिनेया व यामा कंपनीची दुचाकी गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ गुन्हे व मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा तसेच मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ वाहन चोरीचा व चिंचवड पोलिस ठाण्याकडील १ गुन्हा उघडकीस आणले आहे.

१) सन्नीसिंग पापासिंग दुधाणी (वय १९ बिराजदारनगर, हडपसर),
२) अक्षय संतोष सोनी ( वय २८, सुरक्षानगर, हडपसर),
३) बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी ( वय ३५ रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अाहेत. तर यातील आरोपी विधीसंघर्षित बालक याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
हडपसर पोलीस ठाणेच्या अभिलेखावरील घरफोडी व वाहन चोरीच्या दाखल गुन्ह्याचा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे यांनी गुन्ह्याची उकल करण्याकामी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक गुन्हे हमराज कुंभार यांच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी तपास करत असतांना पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, अकबर शेख, प्रताप गायकवाड, शाहिद शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भेकराईनगर येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींची गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता आरोपींनी चौकशीमध्ये हडपसर, मांजरी, गोंधळेनगर, सातववाडी, ससाणेनगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव या परिसरामध्ये घरफोडी, चोरी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ गुन्हे व मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा तसेच मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ वाहन चोरीचा व चिंचवड पोलिस ठाण्याकडील १ गुन्हा उघडकीस आणून आरोपींकडून ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व यामाहा कंपनीची दुचाकी गाडी असे एकूण ६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी १) सन्नीसिंग दुधाणी हा (पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व धुळे जिल्हा) असे एकूण २० गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी आहे. २) बिरजुसिंग दुधानी हा (पुणे शहर व धुळे जिल्हा) असे एकूण २५ गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी आहे.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलिस आयुक्त श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस उपआयुक्त परीमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सहाय्यक पोलिस आयुक्त श्री.कल्याणराव विधाते, हडपसर पोलिस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.रमेश साठे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री.हमराज कुंभार यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हिमालय जोशी, युसुफ पठाण, रमेश साबळे, प्रशांत टोणपे, राजेश नवले, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, प्रविण उत्तेकर यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages