😱 लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 21, 2020

😱 लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले..

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने रंगेहात पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेले फारुख याकूब सय्यद सोलापूरे (वय 53) असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
फारुख सोलापूरे हा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला येथील साने चौकीत नेमणूक देण्यात आली होती. या प्रकरणातील तक्रारदार यांनी बांधकाम केलेल्या इमारतीमधील सहा सदनिका विकल्या होत्या. त्या सदनिकाधारकांकडून काही पैसे येणे बाकी होते. हे पैसे मिळावेत यासाठी तक्रारदाराने चिखली पोलीस ठाण्यात 29 मे 2020 रोजी अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करण्याचे काम उपनिरीक्षक सोलापूर यांच्याकडे होते. गैरअर्जदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोपी सोलापूर याने तक्रारदारांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, सापळा रचण्यात आला होता. फारुख याकूब सय्यद सोलापूरे हे पडताळणीसाठी 5 लाख घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.

Post Bottom Ad

#

Pages