😱 पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच.. कौटुंबिक वादातून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 21, 2020

😱 पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच.. कौटुंबिक वादातून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतर आत्ता अनलॉकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात आर्थिक विवंचना व कौटुंबिक वादावरून आत्महत्येचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शहरात आज कौटुंबिक वादातून पतीने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरज पालसिंग सोनी (वय 27, न्यू नानापेठ) व करीना सूरज सोनी (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मिळालेल्यार प्राप्त माहितीनुसार,
आत्महत्या करणारे दाम्पत्या हे दोघे मूळचे नेपाळमधील आहेत. ते समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत असल्याने ते त्याच इमारतीत राहत होते. दरम्यान काही दिवसापासून दोघात घरघुती कारणावरून वाद सुरू होते. करीना (पत्नी) यांचा भाऊ असल्याने त्या भावासोबत बाहेर झोपल्या होत्या. तर सूरज हे घरात झोपले होते. आज सकाळी करीना (पत्नी) या उठल्यानंतर त्यांनी खोलीचे दार वाजवले पण दार उघडत नसल्याने त्यांनी दार तोडुन आत मध्ये पाहिले असता सूरज (पती) यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी करीना (पत्नी) यांचा भाऊ मयताच्या भावाला घेऊन येतो सांगून गेला. त्यावेळी करीना (पत्नी) यांनी देखील त्यात खोलीत जाऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर करीना (पत्नी) यांचा भाऊ घरी परत आल्यानंतर त्यांना करीना हिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यावेळी समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू असून, दोघां पती-पत्नी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

..पुण्यात आत्महत्येचं सत्र..
▪️ डोंगराच्या टेकडीवरून एका 35 वर्षीय महिलेची उडी मारून आत्महत्या..
चांदणी चौक डूक्करखिंड येथील डोंगराच्या टेकडीवरून एका 35 वर्षीय महिलेने रविवार दि.21 जून रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेची माहिती कोथरूड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानुसार ही महिला बावधनच्या बाजूने ते वारजेच्या दिशेने जात होती. तसेच आत्महत्या करणार्‍या महिलेने पायात चप्पल व अंगावर कोणतेही दागिने परिधान केले नव्हते व या महिलेच्या डाव्या हातावर S.A हे अक्षर गोंधलेले आढळून आले. महिलेने आत्महत्या केल्याचे कारण समजू शकेले नाही. आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

▪️ तुळशी बागेतील एका तरुण चप्पल व्यावसायिकाची आत्महत्या..
तुळशीबागेतील एका चप्पल व्यावसायिक तरुणाने शनिवारी दुपारी सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या वडिलांच्या बहिणीच्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम राजेंद्र बोबडे (वय २३, रा़ नवजीवन सोसायटी, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

▪️ 4 जणांची सामूहिक आत्महत्या..
19 जून रोजी पुण्यात सामूहिक आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे.

▪️ मंडप व्यावसिकाची आत्महत्या.. सिंहगडरस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी पहाटे दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्वप्निल उत्तम रायकर (वय 45, रा.शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. त्यांनी राहत्या घरी किचन रूम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Post Bottom Ad

#

Pages