💐 प्रसंगी कठोर तर कधी प्रेमळ बाजू दाखवत शहराची काळजी घेणाऱ्या खाकी वर्दीतला बाप प्रत्येकासाठी हिरो.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 21, 2020

💐 प्रसंगी कठोर तर कधी प्रेमळ बाजू दाखवत शहराची काळजी घेणाऱ्या खाकी वर्दीतला बाप प्रत्येकासाठी हिरो..

आज जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना, प्रत्येक घरात वडिलांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावादरम्यान पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांनी शहराचा बंदोबस्त अगदी चोखपणे सांभाळला. अनेक पोलिसांना करोनाचा सामना करताना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र आपला परिवार, घर-दार पाठीमागे सोडून कर्तव्याला पहिलं प्राधान्य देत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी एखाद्या बापाप्रमाणेच या शहराची काळजी घेतली.

लॉकडाउन काळात शहराची सुरक्षा करणं, अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना प्रसंगी लाठीचा प्रसाद देणं अशी अनेक जिकरीची काम पोलीस गेल्या ३ महिन्यांच्या कालावधीत करत आहेत. प्रसंगी कठोर तर कधीकधी आपली प्रेमळ बाजू दाखवत शहराची काळजी घेणाऱ्या हा खाकी वर्दीतला बाप प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.

Post Bottom Ad

#

Pages