🚨 पुण्यात दुचाकी वाहन चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक..पाच दुचाकी वाहने जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, June 22, 2020

🚨 पुण्यात दुचाकी वाहन चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी केली अटक..पाच दुचाकी वाहने जप्त..

कोंढवा पोलिस ठाणे अभिलेखावरील वाहन चोरीच्या दाखल गुन्ह्याचा तपास प्रगटीकरण शाखाचे पोलिस करत असतांना पोलिस कर्मचारी अझीम शेख यांना वाहनचोरी व ईतर गुन्हयामध्ये सक्षम सहभाग असणारे गुन्हेगार हे पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये येणार असल्याच्या मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन दुचाकी वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडुन पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.
सतिश मोहन चव्हाण (वय १९, रा.हांडेवाडी रोड पुणे) व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक असे अटक केलेल्याची नावे आहेत.

कोंढवा पोलिसांनी अशाप्रकारे चोरट्यांना घेतले ताब्यात..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून कैद्यांना सोडण्यात आले तसेच वाढत्या बेरोजगारीमुळे पुणे शहरात दुचाकी वाहन चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने याघटनांना प्रतिबंधित करण्याकामी पुणे पोलिस आयुक्तांनी आदेशित केले. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाणेचे मा.वरीष्ठ पोलिस निरिक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी पोलीस ठाणे अभिलेखावरील वाहन चोरीच्या दाखल गुन्ह्यातील चोरट्यांना अटकाव करण्याकामी दिलेल्या सुचनानूसार कोंढवा पोलीस ठाणे प्रगटीकरण शाखाचे पोलिस उपनिरिक्षक श्री.संतोष शिंदे यांच्या अधिपत्याखाली तपास पथकातील पोलिस दुचाकी वाहन चोरट्यांचा शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी अझीम शेख यांना वाहनचोरी व ईतर गुन्हयामध्ये सक्षम सहभाग असणारे गुन्हेगार हे कोंढवा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच लागलीच गुन्हेगाराना जेरबंद करण्याकामी कोंढवा पोलीस ठाणे प्रगटीकरण शाखाचे पोलिस उपनिरिक्षक श्री.संतोष शिंदे यांनी तपास पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांसह मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित इसम सतिश मोहन चव्हाण (वय १९, रा.हांडेवाडी रोड पुणे) व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांस ताब्यात घेत त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुली दिल्यानुसार कोंढवा पोलीस ठाणेमधील अभिलेखा वरील १) भादवि कलम ३७९, गुरनं ६९५/२०२०, २) गुरनं ६८९/२०२० तसेच वानवडी पोलीस ठाणे मधील गुरनं ४८४/२०२० अन्वेय प्रमाणे दुचाकी वाहन चोरीचे दाखल गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्याकडुन एकुण पाच दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यापैकी दोन दुचाकी वाहनांबाबत अदयाप पर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सदर कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी यांच्या सुचनाप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे पोलिस उपनिरिक्षक श्री.संतोष शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार ईकबाल शेख, पोलिस हवलदार योगेश कुंभार, पोलिस नाईक कौस्तुभ जाधव, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस नाईक सुशिल धिवार, पोलिस शिपाई अझीम शेख, पोलिस शिपाई उमाकांत स्वामी, पोलिस शिपाई दिपक क्षिरसागर, पोलिस शिपाई मोहन मिसाळ यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages