👌घरकाम करणाऱ्या गरजू महिलांना गनिमीकावा युवा संघटनेने 5 हजार रुपयांच्या धनराशीची केली मदत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 23, 2020

👌घरकाम करणाऱ्या गरजू महिलांना गनिमीकावा युवा संघटनेने 5 हजार रुपयांच्या धनराशीची केली मदत..

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वयंपाक व धुणे-भांडी करण्यासाठी जात होत्या त्याठिकाणाच्या मालकांनी कोरोनाच्या भीतीमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना काम बंद करण्यास सांगितल्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिल्याने त्यांच्या हाताला काम नाही पोटाला अन्न नाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने गनिमीकावा युवा संघटना महा.राज्य संस्थापक / अध्यक्ष - संजय वाघमारे यांनी पुण्यातील अप्पर, बिबेवाडी भागामधील घरकाम करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 5 हजार रुपयांची धनराशी जमा केली आहे. सदर उपक्रमात सहभागी सौ.मोनाली ताई विधाते व सर्व महिला उपस्थित होत्या.

कोरोना व्हायरसने राज्यात अक्षरश थैमान घातले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या लाखावर पोहोचली आहे. या आजाराचा परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बांधकाम मजूर, फेरीवाले, घर काम करणाऱ्या महिलांसह ज्याचे हातावर पोट आहे त्यासर्वांना बसला आहे. लॉकडाऊन असल्याने ज्या लोकांकडे काम केले त्यांच्याकडून पैसे मिळत नसल्याने उसनवारी व उधारी चुकवण्यासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न ? यासर्वांना पडला आहे. बांधकाम मजूर, फेरीवाले, घर काम करणाऱ्या महिलांना कोणी रोजंदारीवर बोलवतात तर काही रोजंदारीवर काम करतात. महिनाभरासाठी हे जितके दिवस कामावर येतील तितक्याच दिवसांचा पगार त्यांना दिला जातो. मात्र, सध्या कामेच बंद असल्याने या सर्वांवरच घरी बसण्याची वेळ आली आहे. पुढे काम मिळणार आहे या आशेवर अनेकांनी उधार-उसनवारी केली आहे. आता ते पैसे कसे चुकवायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. सध्या काही संस्था, संघटना मोफत शिधा वाटप करत आहेत. मात्र, ही मदत सगळ्यांन पर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय हे संकट केव्हा टळणार, काम परत कधी सुरू होणार याची सगळ्यांना ओढ लागून राहिली आहे.

गनिमीकावा युवा संघटना महा.राज्य संस्थापक / अध्यक्ष - संजय वाघमारे म्हणाले की, घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दुसऱ्याच्या घरात घर काम करणार्‍या महिला आजवर उपेक्षित राहिले आहेत. त्यात कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या कामावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे घर काम करणाऱ्या महिलांचे घर कसे चालणार त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार असा प्रश्न भेडसावत आहे. या घर काम करणाऱ्या महिलांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळतच नाही. त्यातच काही महिलावरच घराची मुख्या जवाबदारी अाहे. या महिला वेगवेगळ्या भागात फिरून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नागरिकांनी घरकाम करणाऱ्या महिलांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या हाताला काम नसल्याने त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या घर काम करणाऱ्या महिलांची अडचण वैयक्तिक आणि घरगुती असल्याने ते लोकप्रतिनिधी व शासन दरबारी कोणीही ऐकून ही घेत नाही व त्यांचे मार्गदर्शनही करत नाही असे शोकांतिका असल्याचे सांगितले आहे.

Post Bottom Ad

#

Pages