😷 पतंजली संस्थाने कोरोनावर पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ आणले जगासमोर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 23, 2020

😷 पतंजली संस्थाने कोरोनावर पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ आणले जगासमोर..

कोरोना सारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणले आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे.
“संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीं आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असं मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केलं. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली,” असंही ते म्हणाले.

रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने ३ दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या ७ दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.

दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. या व्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करोनिल हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages