👉 केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या ‘कोरोनील’ औषधावर लादले निर्बंध.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 23, 2020

👉 केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीच्या ‘कोरोनील’ औषधावर लादले निर्बंध..

मोठ्या दिमाखदार सोहळ्यात योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील आयुर्वेदिक औषध लॉचं केल आहे. कोरोना रुग्णाला बर करण्यासाठी हे औषध गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांच्याकडून करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात पतंजलीचे ‘कोरोनील’ हे औषध आठवडाभरात बाजारामध्ये उपलब्द होणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधावर सध्या निर्बंध लादले आहेत.
पंतजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध कोरोनिल लाँच केलं. या औषधाचा वैज्ञानिक अभ्यास, चाचणी करण्यात आल्याचं पतंजलीने सांगितलं. मात्र याबाबत आयुष मंत्रालयाला काहीच माहिती नाही. त्यामुळे याची सविस्तर माहिती आधी आयुष मंत्रालयाला द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवावी असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till issue is duly examined: Ministry of AYUSH — ANI (@ANI) June 23, 2020

कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. जगभरातील रुग्णसंख्या 92 लाखांवर पोहचलीय तर 4 लाख 74 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 49 लाख 56 हजार जणांची कोरोनाच्या आजारातून मुक्तता झाली आहे. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एका बाजूला कोरोनाचा विळखा वाढत असताना दुसरीकडे त्यावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यावर हजारो डॉक्टर वैज्ञानिक काम करत आहेत. आता योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनातून 100 टक्के बरे करणारे औषध आणल्याचा दावा केला आहे.

कोरोनिलमध्ये गिलोय, अश्‍वगंधा, तुलसी, श्‍वसारी रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी या औषधाचे दररोज सेवन करावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं.

कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकारे उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं. क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

Post Bottom Ad

#

Pages