🚨कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणार्या दोन अारोपींना पोलीसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 23, 2020

🚨कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणार्या दोन अारोपींना पोलीसांनी केली अटक..

आळंदी पोलीस हद्दीत पोलीस कर्मचारी गस्त घालत असतांना दिवसा भर रस्त्या खोदून रस्त्याच्या दोनी बाजूची वाहतुक बंद केल्याचे दिसल्याने "रस्त्याचे काम आत्ता करू नका रात्री करा", असे पोलीस कर्माचा-याने सांगितले असता तिघांनी मिळून पोलीस कर्माचा-याला शिवीगाळ करून अंगावर धावून जात दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रविवारी दि.२१ रोजी रात्री ०७.४५ वाजण्याच्या सुमरास आळंदी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन साळुंखे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन अारोपींना अटक करण्यात आली आहे.

१) सतीश बाजीराव लोखंडे,
२) प्रसाद सतीश लोखंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्या विरोधात सरकारी कर्मात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी पोलीस शिपाई नितीन साळुंखे हे त्यांच्या पोलिस सहकार्या सोबत आळंदी येथे पेट्रोलिंग करीत असतांना एका रस्त्यावर त्यांना जेसीबीच्या सहाय्याने रस्त्या खोदून दोन्ही बाजूची येणारा-जाणारी वाहने अडवली असल्याचे दिसल्याने फिर्यादी यांनी खोदलेल्या ठिकाणी जाऊन आरोपींना ‘रस्त्याचे काम आत्ता कशाला करायचे, रात्री करायचे’ असे सांगितल्याने तिन आरोपींनी चिडून फिर्यादी यांना शिवीगाळ करत दगड घेऊन जीवे मारण्याच्या इराद्याने फिर्यादी यांच्या अंगावर धावून ‘येथून तूला जिवंत जाऊ देणार नाही’ अशी धमकी दिली. याबाबत तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सतीश आणि प्रसाद यांना अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages