🚨पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन फरार अारोपींना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 24, 2020

🚨पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन फरार अारोपींना ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद..

पुणे जिल्ह्यातील हवेली पोलिस स्टेशन परीसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार आरोपींची ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खारवडे, ता.मुळशी, जि.पुणे येथे येणार असल्याची प्राप्त माहिती मिळताच त्याआधारे सापळा रचून दोन आरोपींना जेरबंद केले.

1) प्रतीक नितीन कंक (वय 20),
2) मारुती लक्ष्मण ढेबे (वय 19) हे दोघे राहणार नांदेडफाटा ता.हवेली, जि.पुणे असे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
हवेली पोलिस स्टेशन परीसरात फिर्यादी यांना रविवार दि.२१ जून रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी जीवे मारण्याच्या हेतूने हत्याराने वार करून पळून गेले. याप्रकरणी गुन्ह्यातील जखमी इसम सुरज रमेश देडगे (वय 25, रा.नांदेड फाटा, ता.हवेली, जि.पुणे) यांनी हवेली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असल्याने आरोपींना जेरबंद करण्याकामी हवेली पोलिस व ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस समांतर पातळीवर पाहिजे असलेल्या आरोपींचा तपास करत असतांना बुधवार दि.२४ जून रोजी हवेली पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी खारवडे, ता.मुळशी, जि.पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळताच लागलीच हि माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांना कळवत त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलिस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलिस फौजदार दत्तात्रय जगताप, पोलिस हवालदार मुकुंद आयचीत, पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक गुरू जाधव, पोलिस कॉस्टेबल अमोल शेडगे, पोलिस कॉस्टेबल मंगेश भगत, पोलिस कॉस्टेबल धिरज जाधव यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे खारवडे, ता.मुळशी, जि.पुणे याठिकाणी सापळा रचून दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी प्रतीक नितीन कंक (वय २०), मारुती लक्ष्मण ढेबे (वय १९) दोघे राहणार नांदेडफाटा ता.हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता आरोपींनी दाखल गुन्हां केल्याची कबुली दिली. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हवेली पोलिस स्टेशन येथे हजर केलेे त्यानुसार हवेली पोलिस स्टेशनमधील गु.र.नं २११/२०२० भादवि क. ३०७, ३२४, १४३, १४७, १४९ अन्वेय प्रमाणे हवेली पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रतीक नितीन कंक, मारुती लक्ष्मण ढेबे यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई,
स्थानिक गुन्हे शाखेचे मा.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलिस फौजदार दत्तात्रय जगताप, पोलिस हवलदार मुकुंद आयचीत, पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक गुरू जाधव, पोलिस कॉस्टेबल अमोल शेडगे, पोलिस कॉस्टेबल मंगेश भगत, पोलिस कॉस्टेबल धिरज जाधव यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages