🏥 पुणे महानगरपालिकेची कोविड १९ बाधित उपचारांसाठी करार केलेल्या खाजगी रुग्णालयाबाबत नागरीकांना जाहीर आवाहन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 24, 2020

🏥 पुणे महानगरपालिकेची कोविड १९ बाधित उपचारांसाठी करार केलेल्या खाजगी रुग्णालयाबाबत नागरीकांना जाहीर आवाहन..

जगभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असून राष्ट्रीय आपत्तीचे संकट ओढावलेले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत असून कोविड प्रार्दुभाव प्रतिबंधासाठी पुणे महानगरपालिकेमार्फतही पुणे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. पुणे शहरातील कोविड-१९ विषाणू प्रतिबंधीत करण्याकरिता तसेच रुग्णांच्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांसोबत करार केला असून पुणे मनपाने संदर्भात केलेल्या कोविड बाधित / संशयीत रुग्णांकरीता बेड्स राखीव ठेवण्यात आले असून निश्चित करुन दिलेल्या दरांनुसार उपचार /वैद्यकीय सेवा पुरविणे खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे.

कोविड - १९ पॅनडॅमिक काळातील कोवीड बाधित /संशयीत रुग्णांना पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजनेच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुणे मनपाने पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी करार केलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास (पुणे मनपाचे हद्दीतील निवासी पत्ता असलेली पिवळी / केशरी शिधापत्रिका व वार्षिक उत्पन्न र.रु. एक लाखापर्यंत मर्यादित असलेले) नियमानुसार वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. तसेच मे महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोशिएशन (GIPSA), पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (B.P.T.Act) योजना राबविण्यात येत असून सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या लाभार्थ्यांना निकषांप्रमाणे लाभ देण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जे नागरीक दिलेल्या नमूद योजनेत पात्र ठरत नाहीत व जे पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक आहेत त्यांनी पुणे महानगरपालिकेने करार केलेल्या एकूण १० खाजगी रुग्णालयात कोविड १९ बाधित उपचार घेतल्यास त्या बिलांची प्रतिपूर्ती पुणे मनपाचे निश्चित केलेल्या धोरणानुसार पुणे मनपाचे सी.एच.एस. दराने नियमानुसार पुणे महानगरपालिका करणार आहे.

ज्या रुग्णांची स्वतःची आर्थिक परिस्थिती आहे व जे स्वतः खर्च करु शकतात व जे उपरोक्त नमूद योजनेचे लाभार्थी होवू शकत नाहीत त्यांच्या बिलांची प्रतिपूर्ती पुणे महानगरपालिकेमार्फत अदा करणेत येणार नाही. शासनाच्या दि.२१/०५/२०२० च्या अधिसुचनेनुसार सर्व खाजगी रुग्णालये यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी, दिलेल्या नमूद योजनेत पात्र ठरणा-या नागरीकांनी कोविड - १९ अंतर्गत उपचारांसाठी लाभ घ्यावा असे पुणे महानगरपालिका तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेने कोविड १९ बाधित उपचारांसाठी करार केलेल्या १० खाजगी रुग्णालयाची नावे :-
१) सिंबॉयसीस युनिवर्सिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटर, लवळे, ता.मुळशी, जि.पुणे.

२) भारती हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे. सातारा रोड, धनकवडी, ता.हवेली, जि.पुणे.

३) सहयाद्रि हॉस्पीटल्स लिमिटेड चे सहयाद्रि हॉस्पीटल कोथरुड, पुणे.

४) राव नर्सिंग होम, बिबवेवाडी, पुणे.

५) लता मंगेशकर मेडिकल फौंडेशनचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर,पुणे.

६) श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई- पुणे बायपास, नन्हे, पुणे.

७) इनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटल, ७/९, कोरेगाव पार्क, पुणे -४११००१.

८) पुना हॉस्पिटल,२७, सदाशिव पेठ, अलका टॉकीज शेजारी, पुणे -४११०३०.

९) ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, ५७७/२, दत्तवाडी पोलीस चौकी, पर्वती, पुणे -४११०३०.

१०) भाकरे र सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट प्रा.लि., कात्रज, पुणे -१०.

Post Bottom Ad

#

Pages