🚨जंगलात लपून बसलेल्या फरार पारधी आरोपींच्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 24, 2020

🚨जंगलात लपून बसलेल्या फरार पारधी आरोपींच्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

कोंढवा पोलिस ठाणे अभिलेखावरील गंभीर दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी उंड्री जंगल परिसरामध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलीस कर्मचारी संजीव कळंबे यांना मिळताच तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपी पारधी असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करत मंगळवार दि.२३ जून रोजी छापा टाकून तीन आरोपींच्या मुसक्या आवळत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

१) किस्मत चुटक्या शिंदे (वय २१),
२) कश्यप चुटक्या शिंदे (वय १९),
३) भारत उर्फ मँगो चुटक्या शिंदे (वय ३६) सर्व राहणार अंतुलेनगर, येवलवाडी, पुणे असे अटक करण्यात आलेल्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस ठाणेच्या अभिलेखावरील दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने आरोपींना जेरबंद करण्याकामी कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी आदेशित केल्याप्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करून रेकॉर्डवरली फरार आरोपींचा शोध घेत असतांना मंगळवार दि.२३ जून रोजी कोंढवा तपास पथकातील पोलीस कर्मचारी संजीव कळंबे यांना गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हे उंड्री येथील जंगल परिसरामध्ये लपुन बसल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस नाईक उतेकर मा.पोलिस उपआयुक्त परीमंडळ - ५ पुणे शहर यांचे मार्फत तांत्रीक विश्लेषणाचे साहयाने आरोपी उंड्री जंगल परिसरामध्ये असल्याचे खात्रीशीर माहिती मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री.महादेव कुंभार यांना कळविले त्यांनी दिलेल्या सुचनेनूसार कोंढवा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे, पोलिस हवालदार संतोष नाईक, पोलिस नाईक अमीत साळुंके,पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई ज्योतिबा पवार पोलिस शिपाई किशार वळे, बीट मार्शल कर्मचारी पोलिस नाईक हेमंत राऊत, पोलिस शिपाई विनोंद कांबळे यांनी लागलीच मिळालेल्या माहितीच्या आधारे उंड्री जंगल परिसरात लपून बसलेले आरोपी पारधी असल्याने सर्व खबरदारीच्या उपाय योजना करून त्याठिकाणी छापा टाकला असता आरोपी यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍यांचा पाठलाग करून काही अंतरावरच दाखल गुन्हयांतील फरार आरोपी १) किस्मत चुटक्या शिंदे (वय २१), २) कश्यप चुटक्या शिंदे (वय १९), ३) भारत उर्फ मँगो चुटक्या शिंदे (वय ३६) सर्व राहणार अंतुलेनगर, येवलवाडी, पुणे यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता फरार आरोपींनी कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार तीन आरोपींना कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गु.र.नं ७३४/२०२०, भा.द.वि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलिस ठाणेचे तपास पथकातील मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.चेतन मोरे करीत आहेत.

सदर कामगिरी,
मा.श्री.सुनिल फुलारी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा.श्री.सुहास बावचे पोलीस आयुक्त, परिमंडळ ५.पुणे शहर, मा.श्री.सुनिल कलगुटकर सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा.श्री.विनायक गायकवाड कोंढवा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री.महादेव कुंभार कोंढवा पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिपक बर्गे, पोलिस हवालदार संतोष नाईक, पोलिस हवालदार सुरेश भापकर, पोलिस नाईक अमीत साळुंके, पोलिस नाईक संजीव कळंबे, पोलिस नाईक निलेश वणवे, पोलिस नाईक गणेश आगम, पोलिस शिपाई ज्योतिबा पवार, पोलिस शिपाई किशार वळे, पोलिस नाईक हेमंत राऊत, पोलिस शिपाई विनोंद कांबळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages