🚫 पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी ; गृहमंत्री अनिल देशमुख.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 25, 2020

🚫 पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधावर महाराष्ट्रात बंदी ; गृहमंत्री अनिल देशमुख..

कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा करत ते औषध बाजारात आणणं बाबा रामदेव यांना चांगलच महागात पडलं आहे. आयुष मंत्रालयाच्या आक्षेपानंतर राजस्थान सरकारने गुन्हा नोंदवणार असल्याचं म्हणत या औषधावर बंदी घातली आहे. राजस्थान सरकारनंतर बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ या औषधावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल चाचणीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी असेल, महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी ट्विट करत पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधावर बंदी असल्याचं सांगितलं. “राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्थान, जयपूर पतंजलीच्या कोरोनिलची क्लिनिकल चाचणी झाली की नाही त्याचा तपास करेल. आम्ही बाबा रामदेव यांना चेतावणी देतो की आमचं सरकार महाराष्ट्रात बनावट औषधांची विक्री करण्यास परवानगी देणार नाही,” असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved‘s ‘Coronil’ were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won’t allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020

आयुष मंत्रालयाच्या आक्षेपानंतर बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषधाच्या विक्रीवर बंदी घालणारं राजस्थान हे पहिलं राज्य आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय कोविड-१९ साथीच्या औषधाच्या रूपात कोणतेही आयुर्वेदिक औषध विकलं जाऊ शकत नाही, असं राजस्थान सरकारने आपल्या आदेशात म्हटलं आहे. राजस्थान सरकारने म्हटलं आहे की कोविड-१९ साथीच्या रोगाचा उपचार म्हणून कोणतंही औषध विकलं गेल्यास त्या विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाईल.

आयुष मंत्रालयानंतर उत्तराखंड आयुर्वेद विभागानेही पतंजलीने केलेले दावे फेटाळले आहेत. यासह पंतजलीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र पतंजलीने असा दावा केला आहे की त्यांनी आयुष मंत्रालयाने मागितलेली सर्व माहिती पाठविली आहे. पतंजलीचे कोरोनाविरूद्ध औषध पूर्णपणे बरोबर आहे, असा दावा बाबा रामदेव करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages