🚨 २६ जून जागतिक अंमली पदार्थांविरोधी दिनानिमीत्त पुणे अंमली पदार्थविरोधी गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आढावा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 26, 2020

🚨 २६ जून जागतिक अंमली पदार्थांविरोधी दिनानिमीत्त पुणे अंमली पदार्थविरोधी गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आढावा..

तरुणांना अंमली पदार्थांच्या खाईत लोटणाऱ्या तस्करांविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी वर्षभरात तब्बल ३ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची होळी करून १५७ जणांना अटक केले आहे. मागील १० वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे देशी आणि परदेशी अंमली पदार्थ विरोधी तस्करांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

महाविद्यालयांसह ठिकठिकाणी छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या पथकाकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळे गांजा, चरस, सिगारेट, अफु मेथाफेटामाइन यांसारख्या अंमली पदार्थांच्या विक्रीला लगाम लागला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालखंडात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याविरुद्ध ११९ गुन्हे पुणे पोलिसांनी दाखल केले. त्यामध्ये १५७ जणांना अटक करण्यात आली होती. वर्षभरात सर्वच ठिकाणावरील कारवाईतून तब्बल ३ कोटींवर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर २०२० मध्ये ४१ गुन्हे दाखल करून दोघा नायजेरिनसह ५९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५० किलो गांजा, ६९ ग्रॅम मॅफेड्रोन, ११२ ग्रॅम चरस, ३६८ ग्रॅम कोकेन अशी ४० लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेकडून शहरात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती..
अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत बसस्थानक, सिनेमागृह, शाळा, कॉलेज, गर्दीच्या चौकात बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. त्याशिवाय अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देण्यात आली. विशेषतः शाळा, महाविद्यालयांसह गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करून मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योग, शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पाश्र्वभूमीवर अंमली पदार्थ तस्करांकडून तरुणांना व्यसनाच्या आहारी लावण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, गुन्हे शाखेकडून संबंधित तस्करांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवल्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले जात आहेत.

पुणे शहर अंमली पदार्थ मुक्त बनविण्याचे ध्येय - मा.श्री.बच्चन सिंह पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा...
अंमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडून शहर ड्रग्जमुक्त करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी गुन्हे शाखेकडून सर्व प्रकरणांमध्ये बारकाईने चौकशी करून तस्करांची पाळेमुळे शोधली जात आहेत. त्यामुळेच गतवर्षी तब्बल तीन कोटींवर अंमली पदार्थ जप्त करण्यास मदत झाली आहे. मागील १० वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे असे मा.पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री.बच्चन सिंह यांनी सांगितले आहे.

गुन्हे शाखेची कारवाई..
▪️ सन २०१९ एकुन ११९ केसेस यात १५७ जणांना अटक करून ३ कोटींच्या अंमली पदार्थांची होळी करण्यात आली आहे.

▪️ सन २०२० एकूण ४१ केसेस यात ५९ जणांना अटक करून ४० लाख रूपयांचे नशेली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages