😱 पोलीस कॉन्स्टेबलचा घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टीचा अर्ज.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 26, 2020

😱 पोलीस कॉन्स्टेबलचा घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टीचा अर्ज..

सुट्टीसाठी अर्ज करणे आणि सुट्टी मंजूर करणे ही तशी सर्वसाधारण बाब. पण, सुट्टी मिळवण्यासाठी काय काय कारणं सांगितली जाऊ शकतात, याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टीचा अर्ज लिहिला आहे.

वृत्त संस्थेनुसार, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तैनात असलेल्या राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनमध्ये कुलदीप तोमर नावाचे कॉन्स्टेबल आहेत. तोमर यांची आई गेल्या काही काळापासून आजारी असते. तिच्या देखभालीसाठी 10 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज तोमर यांनी दिला होता. मात्र, आईच्या तब्येतीच्या कारणासोबत त्यांनी अजूनही एक कारण दिलं होतं. ते कारण गमतीशीर आहे. या पत्रात तोमर लिहितात की, माझ्या आईची तब्येत ठीक नसल्याने मला सुट्टीची गरज आहे. तसंच माझ्या घरी एक म्हैस पाळलेली असून तिला नुकतंच रेडकू झालं आहे. तिच्या सेवेसाठी देखील मला सुट्टीची गरज आहे. मी लहान असल्यापासून या म्हशीचं दूध प्यायलो आहे. तिच्या दुधाचे उपकारही मला फेडायचे आहेत. तिचं दूध पिऊनच मी पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत असे. तिच्यामुळेच आज मी पोलीस दलात आहे. त्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. तिने माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे. आता तिची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, असं तोमर यांच्या अर्जात नमूद करण्यात आलं आहे.

तोमर यांचं हे पत्र व्हायरल झालं आणि तोमर यांच्या वरिष्ठांनी त्यांना चांगलंच खडसावलं. मात्र, तोमर यांनी हे पत्र आपण लिहिल्याचं नाकारलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages