🚨जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी येरवडा पोलिसांनी 72 तासांमध्ये 15 जणांच्या आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

🚨जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी येरवडा पोलिसांनी 72 तासांमध्ये 15 जणांच्या आवळल्या मुसक्या..

येरवडा कारागृहातून अटी शर्तींवर काही दिवसांसाठी जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगार नितीन कसबे याचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी 72 तासांमध्ये पंधरा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. नितीन शिवाजी कसबे (24, रा. येरवडा) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

1) कुणाल किसन जाधव उर्फ राज्या (20, खराडी बायपास, खराडी),
2) अभिषेक नारायण खोंड उर्फ अभय पाटील (19, लोहगाव),
3) अक्षय सतिश सोनवणे (24),
4) आकाश उर्फ टक्या भगावान मिरे (23),
5) अर्जुन दशरथ म्हस्के (19),
6) राजविर रणजीतसिंग सौतरा (19),
7) चेतन राजू भालेराव (19),
8) आकाश संजय सकपाळ (21),
9) निलेश लक्ष्मण पुंड (19),
10) गणेश उर्फ बापू आडसूळ (19),
11) लक्ष्मण उर्फ सोनू शिवाजी गजरमल (19),
12) रिपेन्स रॉबर्ट चिनप्पा (19),
13) आकाश वसंत कनचिले (19),
14) प्रज्वल उर्फ पज्या बापु कदम (19),
15) ओंकार युवराज सोनवणे (19, सर्व रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार असलेल्या सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दि.27 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कसबे न्यायालयाच्या आदेशाने अटी शर्तीवर काही दिवसांसाठी जामीनावर कारागृहा बाहेर आला होता. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शादलबाबा चौक येथे सराईत गुन्हेगार आकाश कानचिले, आकश सपकाळ, ओमकार सोनवणे, चेतन भालेराव व त्यांच्या इतर साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून कसबे याचा धारदार हत्यारांनी खून केला. घटनेवळी त्याच्या सोबत असलेला मित्र नागेश कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती.
गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख करत आहे.

Post Bottom Ad

#

Pages