😱पुण्यात रस्त्याच्या कडेला उभाकेलेल्या पीकअप टेम्पोच्या डिकीमधून रोख रक्कम १,७०,०००/- रुपयांची चोरी ; गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

😱पुण्यात रस्त्याच्या कडेला उभाकेलेल्या पीकअप टेम्पोच्या डिकीमधून रोख रक्कम १,७०,०००/- रुपयांची चोरी ; गुन्हा दाखल..

कोंढवा-बुद्रूक परिसरात व्यापार्‍याने रस्त्याच्या कडेला उभाकेलेल्या पीकअप टेम्पोच्या डिकीमध्ये ठेवलेली १,७०,०००/- रूपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यापारी मुजफ्फर (वय २३, रा.मिमपुरा, कैम्प, पुणे) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाता इसमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
व्यापारी फिर्यादी मुजफ्फर हे सोमवार दि.०१ जून रोजी सकाळी ०७.३० ते ०८.०० वाजण्याच्या दरम्यान अलिफ टॉवर जवळ, अश्रफनगर, कोंढवा-बुदुक पुणे येथे सकाळी टेम्पोतून एकाला १,७०,०००/- रुपये देण्यासाठी आले असता फिर्यादी मुजफ्फर यांनी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला आणि काही कामासाठी जात असतांना त्यांनी १,७०,०००/- रुपये रोख रक्कम टेम्पोच्या डिकीमध्ये ठेवली व काही वेळा नंतर काम करून ते परत आले असता त्यांच्या टेम्पोच्या डिकीमध्ये ठेवलेली १,७०,०००/- रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली. रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच व्यापारी मुजफ्फर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाता इसमान विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुरनं कलम ७०८/२०२० भादविक ३७९ अन्वेय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चोरीच्या दाखल गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस ठाणेचे महिल पोलिस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages