😱निसर्ग चक्रीवादळामुळे झाडे, खांब, होर्डींग पडून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

😱निसर्ग चक्रीवादळामुळे झाडे, खांब, होर्डींग पडून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान..

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहात असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वादळी वाऱ्यांमुळे झाडे, खांब, होर्डींग पडून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरु असून खबरदारी म्हणून महावितरणने विज पुरवठा खंडित केला आहे. वादळी वाऱ्याने रत्नागिरी, गणपतीपुळे, भोके, दापोली, संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत रस्त्यावरील भली मोठी होर्डिंग्स वाऱ्याने रस्त्यावर कोसळली आहेत. चक्रीवादळामुळे संगमेश्वरजवळच्या डिंगणी कोंडवीवाडीतील ग्रामस्थ राजाराम खांबे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर देवरुख जवळच्या हरपुडे मराठवाडी येथील श्री केदारेश्वर मंदिरालगत असलेल्या गायकवाड यांच्या घरासमोरील फणसाचे झाड विजेच्या खांबावर कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. सुदैवाने विज पुरवठा खंडित असल्याने दुर्घटना घडली नाही. जिल्ह्यातील वाऱ्याचा वेग वाढत निघाला असून नागरिकांनी कोणत्याही करणासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

निसर्ग वादळामुळे रत्नागिरीजवळ समुद्रात अजस्त्र लाटांचे तांडव सुरू झाले आहे. भगवती बंदर येथे नांगरून ठेवलेली एक नौका वादळाबरोबर भरकटत मिऱ्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यांच्या समुद्रकिनारी प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत तर समुद्रकिनाऱ्यावरची कच्ची बांधकामे वादळी वाऱ्यांनी उध्वस्त केली आहे. काही ठिकाणी तारा पडल्याने वीज वितरण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत केला आहे.
वादळी  वाऱ्यांमुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अजस्त्र झाड उन्मळून पडले..
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ असलेल्या नवीन मठाजवळ सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अजस्त्र झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. हे कळताच नाणीज येथील तलाठी मिस्त्री त्वरीत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले, त्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी असे जुनी झाडे आहे. वादळी वाऱ्यांमुळे ती कोसळण्याची भीती असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगत प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
देवगड तालुक्यामध्ये मोठे नारळाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये खालची बाजारपेठ येथील संतोष परब यांच्या राहत्या घरावर घराच्या मागील बाजूस असलेले मोठे नारळाचे झाड पडले. यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घरात परब कुटुंबियांचे कायम स्वरूपी वास्तव्य आहे. सुदैवाने घराच्या मधोमध नारळाचे झाड पडल्याने घरातील कुणाला दुखावत झाली नाही. मात्र छप्पर तुटल्याने घरात पाणीच पाणी होऊन घरातल्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घरातील मंडळींना अन्यत्र हलविले. बुधवारी रात्रीपासून देवगड तालुक्याला मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी झोडपून काढले आहे.

Post Bottom Ad

#

Pages