🤝 पुणे पोलीस दलास अविरतपणे मदतकार्य करणार्या सौ.कांता पवार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

🤝 पुणे पोलीस दलास अविरतपणे मदतकार्य करणार्या सौ.कांता पवार..

आजच्या काळात पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे पोलिसांना देवपण लाभले आहे. नागरिक व पालिका प्रशासन, सरकार यांचा सर्वात विश्वासू असे पोलिस आहे. राज्यात कुठेही अप्रिय घटना घडली किंवा जास्त पाऊस झाला, काही मदत कार्य पाहिजे तर आपसूकच लोकांच्या नजरा पोलिसांकडे विश्वासाने वळतात. कारण पोलिस सर्वांच्या सेवेसाठी 24 तास हजर असतात. पण पोलिसांनाही काही नागरिक सेवाभावी व्रताने अविरतपणे मदत कार्य करत असतात असे "अखिल महाराष्ट्र पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक सौ.कांता पवार" हे पालखी, दहीहंडी, नवरात्र, गणपती आदी इत्यादी आणि इलेक्शन मध्ये जिथे गर्दी होण्याची ठिकाण आहेत तेथे बंदोबस्त देण्याचे काम केले जात आहे.
"अखिल महाराष्ट्र पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक सौ.कांता पवार" यांनी कुटुंब सांभाळून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्ताचे मदत कार्य करत असतात. पोलिसांना आपण काही मदत करू शकतो का ? या भावनेतून सौ.कांता पवार यांनी 2002 मध्‍ये अखिल महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेची स्थापना केली आहे. 2002 पासून ते आज तागायत पर्यंत सौ.कांता पवार या स्वतः अखिल महाराष्ट्र पोलिस मित्र संघटनेचे सभासद पोलिसांना निशुल्क मदत करत आहेत. ना वेळेची परिसीमा !! ना कोणत्या गोष्टीची खंत !! वैयक्तिक स्वखर्चाने पोलीस मित्र सभासदांना मानधन देत आहेत. पोलिसांना बंदोबस्त करण्याचे मदत कार्य करतात. पोलीस प्रशासनात कमी मनुष्यबळामुळे माणसा गणिक पोलीसांवर सुरक्षेची जबाबदारी असते पण सणावारांच्या वेळी पोलिसांना दैनंदिन घडणारे गुन्हे व त्यांचा तपास करण्याकामी पोलिसांची गरज पडते त्यावेळी सणावाराला गणपती, एकादशी इत्यादी मनुष्यबळाची आवश्यकता भासत असल्याने यावेळी पोलिस मित्र सौ.कांता पवार या स्वतः व त्यांची सभासद पोलीस प्रशासनाला बंदोबस्त करण्याकामी मदत कार्य करत आहेत.
कोरोना (कोविंड - 19) घातक विषाणूंचा प्रादुर्भावच्या अनुषंगाने प्रशासनाने लॉकडाऊन व संचारबंदीचे प्रभावी हत्यार उपसले त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. आस्थापने व हातावर पोट असणाऱ्यांना काम न मिळाल्याने त्यांची अवस्था मोठ्या प्रमाणात बिकट होत गेल्याने पैसे जवळ नसल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या गरजवंतांना पोलिस मित्र सौ.कांता पवार या स्वतः व त्यांच्या सभासदानी भुकेने व्याकूळ झालेल्या गरजवंतांना दर दिवशी सकाळ आणि संध्याकाळी 200 जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले.
लाॅकडाउनच्या 1, 2, 3, 4 व आत्ता चालू असलेल्या 5 टप्प्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नाकाबंदी व बंदोबस्त सांभाळत नागरिकांना कोरोना विषयी प्रबोधन करण्याचे मोलाचे काम करत आहेत.
 

Post Bottom Ad

#

Pages