👌पुण्यात डेक्कन पोलीस ठाण्याचा सुत्य उपक्रम ; शेल्टर होम मधील बेघर नागरीकांच्या लहान मुलांना नियमित दररोज १० ते १२ लिटर दुधाचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 3, 2020

👌पुण्यात डेक्कन पोलीस ठाण्याचा सुत्य उपक्रम ; शेल्टर होम मधील बेघर नागरीकांच्या लहान मुलांना नियमित दररोज १० ते १२ लिटर दुधाचे वाटप..

पुणे शहरातील मालधक्का, पुणे रेल्वे स्टेशन भागात राहणाऱ्या बेघर नागरीकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था नसल्याने दिनांक ०८/०४/२०२० रोजी पासून पुणे म.न.पा प्रशासन व डेक्कन पोलीस ठाणे यांनी कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळामध्ये डेक्कन पोलीस ठाणे हद्दीतील सौ.अनुसयाबाई खिलारे, पुणे म.न.पा. शाळा, एरंडवणा, पुणे येथे शेल्टर होम सुरु करण्यात आले आहे. याशेल्टर होम मध्ये मालधक्का, पुणे रेल्वे स्टेशन भागातील १२० बेघर नागरीक राहत आहेत.
शेल्टर होम बेघर नागरीकांची जेवणाची व राहण्याची पुणे महानगर पालिकाकडुन व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु शेल्टर होममध्ये नागरीकांचे ३० ते ३५ लहान मुले-मुली असुन त्यांना शेल्टर होममध्ये दुध न मिळाल्याने लहान मुलांची भुक भागत नसल्याचे डेक्कन पोलीस ठाणेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आल्याने इतरांच्या मदतीने डेक्कन पोलीस ठाणेचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिपक लगड यांनी बेघर नागरिकांच्या लहान मुलांना दिनांक ३०/०४/२०२० रोजी पासुन दररोज नियमित १० ते १२ लिटर दुध वाटप करण्यात येत आहे. तसेच तेथे राहत असलेले बेघर नागरीक व त्यांच्या लहान मुलांना कोरोना (कोविड-१९) या संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डेक्कन पोलीस ठाणेकडुन सॅनिटायझर, मास्क, हॅन्डवॉश, गॅससिलेंडर इत्यादी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

#

Pages