🚨 पुण्यात डॉक्टरला किडनॅप करुन ७ लाखांची खंडणी घेणार्या ४ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, June 4, 2020

🚨 पुण्यात डॉक्टरला किडनॅप करुन ७ लाखांची खंडणी घेणार्या ४ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने केले जेरबंद..

हडपसर परीसरात फिर्यादी डॉक्टरच्या क्लीनीकमध्ये आरोपी महिला वैदयकिय तपासणीसाठी पेशंट म्हणून आली डॉक्टरांनी महिलेची पेंशट म्हणुन तपासनी करत असतांना महिला पैशटने मुद्दाम आरडा-ओरडाचा बनाव केला असता क्लीनीकच्या बाहेर थांबलेल्या महिलेच्या साथीदारांनी डॉक्टरला धक्काबुक्की करत पोलीस असल्याचे सांगून डॉक्टरला जबरदस्तीने किडनॅप करून ७ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याचा समांतर पातळीवर शोध घेत असतांना पुणे शहर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (प) गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून चार सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक केली आहे.

डॉक्टरला किडनॅप करुन खंडणी घेणारे आरोपी १) स्वयंघोषित पत्रकार प्रदिप ज्ञानदेव फासगे (वय ३७, रा.प्रिझम सोसायटी, मांजरी, पुणे),
२) कैलास भानुदास अवचिते (वय ३८, रा.महात्मा फुले वसाहत, हडपसर, पुणे),
३) पुणे शहर पोलीस येथे कर्तव्यावर असलेला समीर जगन्नाथ थोरात (रा.हडपसर, पुणे),
४) महिला सौ.आरती प्रभाकर चव्हाण (वय २९, रा.एकनाथ पुरम सोसायटी फुरसुंगी,पुणे) यांना पुणे शहर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (प) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर हडपसर भागातील एका क्लीनीक मध्ये एक महिला वैदयकिय तपासणीसाठी पेशंट म्हणुन रविवार दि.३१ मे रोजी डॉकटरांकडे गेली होती. डॉक्टरने महिलेला पेंशट म्हणुन तपासत असतांना महिला पैशटने मुद्दाम आरडा-ओरडा केला त्यावेळी क्लीनीकमध्ये बाहेर थांबलेल्या महिलेच्या साथीदारांनी लोंकाना आत मध्ये बोलावुन डॉक्टरला धक्काबुक्की करत पोलीस असल्याचे सांगत डॉक्टरला जबरदस्तीने त्यांचेकडील स्वीष्ट कार मध्ये बसवुन किडनॅप करुन सासवडचे दिशेने पळवुन नेले त्यानंतर पुन्हा हडपसर रोडवरील एका ऑफिस मध्ये डांबुन ठेवले. त्याठिकाणी डॉक्टरला किडनॅप केलेल्या इसमांनी शिवीगाळ करत मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत आम्ही पत्रकार आहोत, असे सांगुन तुमच्यावर पोलीस केस झाली तर तुमची व तुमच्या हॉस्पीटलची बदनामी होईल त्यापेक्षा तुम्ही हे प्रकरण तात्काळ मिटवुन घ्या, असे सांगुन प्रकरण मिटवण्याकरिता त्यांचेकडे १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती 6 लाख रुपये देण्याची जबरदस्तीने मागणी केल्याने डॉक्टरांनी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी लॉकडाऊनचे काळात त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडुन ७ लाख रुपयांची खंडणी आरोपींना दिल्यानंतर सांयकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी डॉक्टरची सुटका केली. याघडलेल्या प्रकारामुळे डॉक्टर खुपच घाबरले व तणावामध्ये त्यांनी आपल्या जवळील पोलीस मित्रांशी संपर्क साधला व घडलेल्या घटनेबाबत माहीती दिली. त्यावेळी पोलीस मित्राने डॉक्टरला धीर देत याबाबत पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार हडपसर पोलिस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलिस ठाणेमध्ये दाखल झालेला गुन्हा समांतर पातळीवर शोध घेत असतांना पुणे शहर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (प) गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहीते यांच्या सुचने नुसार व मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी दाखल गुन्हयातील आरोपी १) स्वयंघोषित पत्रकार प्रदिप ज्ञानदेव फासगे (वय ३७, रा.प्रिझम सोसायटी, मांजरी, पुणे), २) कैलास भानुदास अवचिते (वय ३८, रा.महात्मा फुले वसाहत, हडपसर, पुणे), ३) पुणे शहर पोलीस येथे कर्तव्यावर असलेला समीर जगन्नाथ थोरात (रा.हडपसर, पुणे), ४) महिला सौ.आरती प्रभाकर चव्हाण (वय २९, रा.एकनाथ पुरम सोसायटी फुरसुंगी,पुणे) यांना छापा टाकून ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता दाखल गुन्हयातील सराईत गुन्हेगार आरोपी सांगितले की, ते अशाप्रकारे प्रतिष्ठित डॉक्टरांचा शोध घेवुन त्यांना सावज बनवून त्यांच्याकडून मोठमोठी रक्कम खंडणीच्या स्वरुपात घेवुन गुन्हे करत असल्याची माहीती दिली. सराईत गुन्हेगार यांना हडपसर पोलिस ठाणेमध्ये गु.र.नं - ९२२/२०२० भादविक. ३६४(अ) ३८४, ३८६, ३८८, ३२३, ५०६(१), १४३,३४ अन्वेय प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पुणे शहर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (प) गुन्हे शाखेचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मोहीते करीत आहेत.

सदरची कामगिरी,
मा.गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चन सिंग, मा.सहायक पोलीस आयुक्त श्री.शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, नितीन शिंदे, पथकातील पोलीस कर्मचारी प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, पांडुरंग वांजळे, हनुमंत गायकवाड, महेश कदम, उदय काळभोर, विजय गुरव, सुनिल चिखले, फिरोज बागवान, अमोल पिलाणे, संदीप साबळे, मोहन येलपलेमहिला कर्मचारी रुपाली कर्णवर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages