🚨पुण्यात मोबाईल सिमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी १८,२५,५००/- रुपयांची केली फसवणुक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 5, 2020

🚨पुण्यात मोबाईल सिमकार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी १८,२५,५००/- रुपयांची केली फसवणुक..

कोथरूड परीसरात राहणारे फिर्यादी यांना अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीने फोन करुन त्यांचा मोबाईल मधील सिमकार्ड अपग्रेड करण्याचे सांगून नविन सिमकार्ड क्रमांक असा मॅसेज सिमकार्ड कंपनीस पाठविण्यास भाग पाडत त्यांची वैयक्तीक संपुर्ण माहिती मिळवून त्याद्वारे यांच्या बँकेतील बचत खात्यामधुन १,८०,१४८/- रुपये व १६,४५,३५२/- रुपयांचे पर्सनल लोन मंजुर करुन कर्जाची रक्कम काढुन घेत फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणीसचिन कुलकर्णी (वय ४५, रा.कोथरुड, पुणे) यांनी कोथरूड पोलिस ठाणेमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोथरूड परीसरात दि.०६ मे रोजी १७.१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीने सचिन कुलकर्णी (वय ४५, रा.कोथरुड, पुणे) यांना फोन करुन त्यांचा मोबाईल मधील सिमकार्ड अपग्रेड करण्याचे सांगून नविन सिमकार्ड क्रमांक असा मॅसेज सिमकार्ड कंपनीस पाठविण्यास भाग पाडत नविन सिमकार्डद्वारे नेट बैंकींगचा वापर करुन सचिन कुलकर्णी यांच्या बँकेतील बचत खात्यामधुन १,८०,१४८/- रुपये परस्पर काढुन घेवुन त्याचप्रमाणे दि.०८ मे रोजी १६,४५,३५२/- रुपयांचे पर्सनल लोन मंजुर करुन कर्जाची रक्कम देखील काढुन घेतली. सचिन कुलकर्णी यांची अशी एकुण १८,२५,५००/- रुपये रक्कम फसवणुक केली आहे. फसवणुक झाल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात येताच त्यांनी कोथरूड पोलिस ठाणेमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्ती विरोधात कोथरूड पोलिस ठाणेमध्ये गुरनं/कलम १४५९/२०२० भादविक ४१९, ४२० माहिती व तंत्रज्ञान का.क ६६ (क) (ड) अन्वेय प्रमाणे गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

सदरची घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) के.बी.बालवडकर करत आहे.

Post Bottom Ad

#

Pages