🔮मानवजातीला पर्यावरणाविषयी जागरूक करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन ५ जून.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 5, 2020

🔮मानवजातीला पर्यावरणाविषयी जागरूक करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन ५ जून..

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जूनला साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याचे कारण म्हणजे मानवजातीला पर्यावरणाविषयी जागरूक करणे. वास्तविक, केवळ वातावरणामुळेच मानव आणि इतर प्राण्यांचे जीवन शक्य आहे. पर्यावरणात जर मानवाने समतोल राखला तर मानवजात सृष्टीत टिकून राहणार आहे. जगातील वातावरण सतत दूषित होत आहे, ज्याचा आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. तथापि, गेल्या तीन महिन्यांत जागतिक साथीच्या कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण निश्चितच कमी झाले आहे. पण हा पर्यावरणाचा फक्त एक भाग आहे.

१०० पेक्षा जास्त देशांमध्ये पर्यावरण दिवस साजरा..
१९७२ रोजी पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्राने १९७४ पासून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. प्रदूषणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी एक जागतिक मंच बनवला आहे. १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पर्यावरण दिवस साजरा केला जातो.

२०२० ची थीम ‘वेळ आणि निसर्ग..
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची थीम ठरवली जाते. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असल्याने यावेळी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यावेळी पर्यावरण दिन २०२० ची थीम ‘वेळ आणि निसर्ग’ ही आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आणि मानवी विकासावर आधारलेल्या आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे.

२०१९ मध्ये थीम वायू प्रदूषण..
२०१९ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाची थीम वायू प्रदूषण होती. याचं यजमानपद चीनकडे होतं. २०१८ मध्ये भारताने ‘बीट प्लास्टिक प्रदूषण’ या थीमसह जागतिक पर्यावरण दिनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. रोपांची लागवड करण्यासाठी सरकारने एक मोहीमही सुरू केली होती, त्यामध्ये सोशल मिडीयावर वृक्षारोपण केल्यानंतर सेल्फी पोस्ट करण्यास सांगितलं होतं.

Post Bottom Ad

#

Pages