😷 पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 5, 2020

😷 पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर..

पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 438  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण..
▪️ पुणे : जिल्हयातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 352 ने वाढ झाली आहे कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
▪️ सातारा : जिल्हयातील 597 कोरोना बाधीत रुग्ण असून 251बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 19 ने वाढ झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 24  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
▪️ सोलापूर : जिल्हयातील 1 हजार 144 कोरोना बाधीत रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 9 ने वाढ झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या  571 आहे. कोरोना बाधित एकूण 97  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
▪️ सांगली : जिल्हयातील कोरोना बाधीत 128 रुग्ण असून 78 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 ने वाढ झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 46 आहे. कोरोना बाधित एकूण 4  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
▪️ कोल्हापूर : जिल्हयातील 653 कोरोना बाधीत  रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 ने वाढ झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत पुणे विभागामध्ये एकुण 96 हजार 596 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 87 हजार 475 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 121 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 80 हजार 885 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 438 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून आलेले नागरिक :
विभागामध्ये PHASE-1मध्ये परदेशातून 457 व्यक्तीचे आगमन झालेले असून PHASE-2 मध्ये परदेशातून एकूण 392 व्यक्तीचे असे एकूण 849 व्यक्तीचे आगमन झालेले आहे . या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा :
पुणे विभागातून रेल्वे द्ववारे दि.05.06.2020 पर्यंत एकुण 154 रेल्वेतून 2,05,684 प्रवासी परप्रातांत रवाना करण्यात आलेले आहेत.

अन्न धान्य वितरण :
▪️ पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9095 असून आज रोजी 9095 सुरू आहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप 97.42 टक्के झालेले आहे.
▪️ दि. 04/06/2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत यामध्ये 20069 गरजूंनी लाभ घेतला आहे.

Post Bottom Ad

#

Pages