🤝 निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्याच्या वारसांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 5, 2020

🤝 निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्याच्या वारसांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश..

कोरोना विषाणूच्या संकटाशी दोन हात करत हतबल झालेले असतांनाच महाराष्ट्र आलेल्या निसर्ग चक्रीवादळात सापडलेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तर कोणाला आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. अशा संकटाच्या वेळी प्रशासनाने धाव घेत निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मंजाबाई अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील, खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल आदी अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages