👉रुग्णालयातील बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, June 5, 2020

👉रुग्णालयातील बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन..

कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. या डॅश बोर्ड ची सुविधा www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard या लिंक वर संगणकीय प्रणाली द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रुग्णालयातील बेड च्या उपलब्धतेची माहिती या डॅश बोर्ड वर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅश बोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल.

नागरिकांनाश बोर्डची माहिती मोबाईल अँप द्वारे पाहता येण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच ही सुविधा DivCompunebeds या मोबाईल अँप द्वारे देखील एका क्लीक वर पाहता येणे शक्य होणार आहे. यासाठी आय टेक बिझनेस सोल्युशन्स या पुण्यातील कंपनीचे शैलेंद्र फाटक यांनी तांत्रिक काम केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages