👌बिबवेवाडी पोलीसांना कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क व सॅनिटायझरचे वाटप.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 6, 2020

👌बिबवेवाडी पोलीसांना कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क व सॅनिटायझरचे वाटप..

कोरोनाच्या लढ्यात अहोरात्र कर्तव्य बजाविणार्‍या बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील पोलिस कर्मचार्यांचे उत्तम आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी शुक्रवार दि.5 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान प्रभाग क्रमांक 37 चे कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्यातर्फे श्री.भिमराव बबन साठे यांनी स्वतः उपस्थित राहून आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे पाकीटे तर सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री.खोकले, पोलिस उपनिरीक्षक श्री.प्रकाश वाघमारे,पोलिस उपनिरीक्षक श्री.किरण लिटे, पोलिस हवलदार तनपुरे, पोलिस हवलदार रवी चिप्पा, श्री.भिमराव बबन साठे तथा सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख, हनुमंत देवकुळे, आप्पा वाल्हेकर आदी उपस्थित होते.
श्री.भिमराव बबन साठे म्हणाले की, कोरोनाचे संकट छाया गडद होत असतांना पोलीस जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच बिबवेवाडी पोलीस कर्मचार्यांनी प्रत्येक नागरिकांना घरी बसण्यास भाग पाडले. या बिबवेवाडी पोलीसांच्या कार्य तत्परतेने बिबवेवाडी मधील कोरोनाचे संक्रमण अटोक्यात येत आहे. रात्रं-दिवस पोलीस बंदोबस्तामध्ये असतांना त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरिता त्यांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे पाकीटे तर सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीत पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात प्रभाग क्रमांक 37 चे कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्या पुढाकारातून श्री.भिमराव बबन साठे यांनी स्वतः उपस्थित राहून बिलाल मज्जित, साईनगर शिवरायनगर येथे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.किरण लिटे यांच्या शुभ हस्ते आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे पाकीट, मास्क, सॅनिटायझरचे सुमारे 580 कुटुंबांना घरपोच किट वाटप केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना याचा ताण पोलीस यंत्रणेवर येत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या उत्तम कामगिरीने कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात येत आहे. अहोरात्र काम करणार्‍या पोलीस बांधवांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे पाकीटे तर सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याचे प्रभाग क्रमांक 37 चे कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.वर्षाताई भीमराव साठे यांच्या वतीने श्री.भिमराव बबन साठे यांनी स्पष्ट करण्यात आले.

Post Bottom Ad

#

Pages