👉 खाजगी हॉस्पिटलच्या नफे खोरी विरोधात ग्राहक हक्क संघर्ष समितीची पुणे जिल्हाधिकारी कुणाल किशोर राम यांच्याकडे तक्रार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, June 6, 2020

👉 खाजगी हॉस्पिटलच्या नफे खोरी विरोधात ग्राहक हक्क संघर्ष समितीची पुणे जिल्हाधिकारी कुणाल किशोर राम यांच्याकडे तक्रार..

आरोग्यसेवेसाठीच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचा अभाव असल्यामुळे लोकांना आरोग्यासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र आरोग्यसेवेसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आज काहीही बंधने नाहीत. अनेकदा खाजगी रुग्णालये या नियमनांच्या अभावाचा गैरफायदा घेतात आणि रुग्णांना जास्त शुल्क लावतात. खाजगी रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातील असे प्रशासनाने सांगितले होते तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खाजगी नोबल हॉस्पिटलद्वारे खुलेआम लुटालूट करत खाजगी हॉस्पिटल शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत एक लाख ते दोन लाख रुपये मेडिकलच्या औषधांचा वापर करून खाजगी हॉस्पिटल व त्यांच्या संबधित मेडिकल शॉप तुपाशी रूग्ण मात्र उपाशी अशीच काहीची घटना पुण्यात घडत आहे. याबाबत, ग्राहक हक्क संघर्ष समितीची मा.पुणे जिल्हा अधिकारी कुणाल किशोर राम यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करत संबंधित खाजगी हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले योजना अंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात यावे असे सांगितले.
पुणे शहरात कोव्हिड 19 रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याचा फायदा घेऊन खाजगी रुग्णालय मनमानी कारभार करीत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. शासन आदेश हॉस्पिटलसाठी नसून सरकारी रुग्णालयासाठी आहेत असे सांगून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. आमचे हॉस्पिटल खाजगी आहे. शासनाची कोणतीही योजना आमच्या कडे लागू होत नाही. हॉस्पिटल जे बिल देईल तेच अंतिम बिल राहील असे ठणकावून सांगत आहेत.
राज्य शासनाने दि. 30 एप्रिल 2020 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असतांना काही रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मंत्री श्री.अस्लम शेख यांनी दिले होते.
नोबल हॉस्पिटलचे अंतिम बिल रेट..
1) कोव्हिड 19 वार्ड साठी icu विदाउट व्हेंटिलेटर, isolation 35,000.00 रुपये,
2) कोव्हिड 19 वार्डसाठी icu विथ व्हेंटिलेटर + isolation 45,000.00 प्रत्यक दिवसाला आकारले जात आहे. तसेच मेडिकलची औषधे 1,50,000 ते 2,00,000 पर्येंत वापरली जातात तश्या चिठ्या दिल्या जातात. वेगवेगळ्या डॉक्टर consultation fees 12 दिवसाची 50,000 ते 75,000 रुपये लावली जाते. अश्याच वेगवेगळ्या ट्रिक वापरून रुग्णांना 5 लाख ते 7 लाख पर्यत बिल केले जाते असे अनुभव रुग्णाच्या नातेवाईक यांनी ग्राहक हक्क संघर्ष समिति (महा.राज्य) अध्यक्ष - मिलिंद राजहंस यांच्या कडे बोलून दाखवले. त्याची शहानिशा केली असता हे सत्त्य असल्याचे समजले.
यासंदर्भात 1) मा.आयुक्त पुणे महानगर पालिका,
2) आरोग्य प्रमूख पुणे महानगर पालिका,
3) विभागीय आयुक्त कौसील हॉल विधान भवन पुणे,
4) मुख्य सचिव आरोग्य मंत्रालय मुंबई,
5) मा.राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,
6) मा.अजित पवार उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालक मंत्री पुणे जिल्हा, यांना सर्व पुराव्यासह ई-मेलद्वारे तक्रार देण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी संबंधित हॉस्पिटल वर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहक हक्क संघर्ष समिति (महा.राज्य) अध्यक्ष श्री.मिलिंद राजहंस यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages