😱पुण्यात तळीरामांनकडून भाजपची माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 7, 2020

😱पुण्यात तळीरामांनकडून भाजपची माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की..

कोथरूड भागात साहजानंद सोसायटीजवळ दारू पीत बसलेल्या तळीरामांना नागरिकांनी हटकल्यावरून झालेल्या वादात भाजपची माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना तळीरामांनकडून धक्काबुक्कीत कुलकर्णी यांच्या हाताची दोन बोटं फ्रॅक्टर झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करत कोथरूड पोलिसानी दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे.

अमर सयाजी बनसोडे (वय २६),  विनोद सुरेश गेंदे (वय २६) आणि रोहिदास उर्फ तेजस  राजेंद्र कांबळे (वय १९, तिघेही रा. गणजय सोसायटी, कोथरूड) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages