🚨पुणे पोलिस आयुक्तालयात प्रायोगिक तत्त्वावर ‘व्हर्च्युअल अपॉईंटमेंट’ उपक्रम सुरू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, June 7, 2020

🚨पुणे पोलिस आयुक्तालयात प्रायोगिक तत्त्वावर ‘व्हर्च्युअल अपॉईंटमेंट’ उपक्रम सुरू..

करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात प्रायोगिक तत्त्वावर ‘व्हर्च्युअल अपॉईंटमेंट’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन तक्रारी मांडता येणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे’ असे पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकेटशम यांनी सांगितले. करोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

डॉ.के.व्यंकेटशम म्हणाले,
‘ पोलिस आयुक्तालयात नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे ‘व्हर्च्युअल अपॉईंटमेंट’ ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर पोलिस आयुक्तालयात राबविली जाणार आहे. पोलिस आयुक्तालयातील गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या तक्रारी मांडता येणार आहेत.’

‘या उपक्रमांतर्गत संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या क्रमांकाद्वारे दोन ते तीन मिनिटांमध्ये तक्रारदार हे आपली तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे मांडू शकणार आहेत. सध्या पोलीस आयुक्तालयात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे’ असे डॉ.के.व्यंकेटशम म्हणाले.

Post Bottom Ad

#

Pages